एएफसी पात्रता फुटबॉल स्पर्धा :- अल खोबार (सौदी अरेबिया) : एएफसी १९ वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय संघाचा दुसरा सामना शुक्रवारी सौदी अरेबियाशी होणार आहे.

बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताला उझबेकिस्तानने २-० असे पराभूत केले होते. ‘‘आमच्या अपेक्षाप्रमाणे हा निकाल नाही. मात्र हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागेलच. आता या पराभवातून सावरत आम्ही पुढील सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक फ्लॉइड पिंटो यांनी सांगितले.

सौदी अरेबियाने २०१८ मध्ये एएफसी १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवून सौदी अरेबियाने तीन गुणांची कमाई केली होती. हा सामना आमच्यासाठी खडतर असेल, असेही प्रशिक्षक पिंटो यांनी सांगितले.