अफगाणिस्तान विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने ५० षटकात ७ बाद २४९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने ४८.४ षटकात सामना जिंकला. या विजयासह विंडीजने मालिका ३-० अशी जिंकली.

सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजीच्या वेळी एक विचित्र घटना घडली. कायरन पोलार्ड गोलंदाजी करत असताना त्याचा पाय क्रीजच्या पुढे पडला. त्यावेळी पंच जोरात नो-बॉल असं ओरडले. हे पोलार्डने ऐकले आणि चतुराईने त्याने तो चेंडूत हातातच ठेवला. त्याच्या या कृत्यामुळे पंचांनी दिलेला नो-बॉल रद्द केला आणि त्या ऐवजी ‘डेड बॉल’चा निर्णय दिला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने सलामीला खेळत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावत त्याने ५० धावांची खेळी केली. असगर अफगाणने संघाला बळ दिले. त्याने ८५ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. याशिवाय अनुभवी मोहम्मद नबी यानेही ५० धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शाय होप याने दमदार शतक ठोकले. त्याने १४५ चेंडूत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. ब्रेंडन किंग (३९), निकोलस पूरन (२१), कायरन पोलार्ड (३२) आणि रॉस्टन चेस (नाबाद ४२) या चौघांनी त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे विंडीजला विजय मिळवणे सोपे झाले.

शाय होपला सामनावीर तर रॉस्टन चेसला मालिकावीर घोषित करण्यात आले.