गुलबदीन नैबच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेर संपुष्टात आलंय. अखेरच्या सामन्यात विंडीजने अफगाणिस्तानवर मात केली आहे. इक्रम अलीने विंडीजच्या गोलंदाजीचा सामना करत ८६ धावांची खेळी केली. या कामगिरीसह इक्रमने विश्वचषकात अनोखा विक्रम आपल्यानावे जमा केला आहे. इक्रमने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. इक्रम अली विश्वचषक इतिहासात सर्वात कमी वयात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

सचिन तेंडुलकरने वयाच्या १८ व्या वर्षी १९९२ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या इक्रम अलीने ९२ चेंडूत ८६ धावा करत हा विक्रम आपल्या नावे जमा केला.

सचिनसारख्या खेळाडूने केलेला विक्रम मी मोडू शकलो याचा मला आनंद आहे. मला या गोष्टीचा कायम अभिमान राहिल. इक्रमने सामना संपल्यानंतर पीटीआयशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.