अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ पुन्हा एकदा भारतामध्ये येणार आहे. आयसीसीने आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांना कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा दिल्यानंतर, हे दोन्ही संघ पहिल्यांदाच मोठ्या दौऱ्यात समोरासमोर येत आहेत. देहरादूनच्या मैदानावर अफगाणिस्तानचा संघ आयर्लंडविरुद्ध 3 टी-20, 5 वन-डे आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. 2019 साली फेब्रुवारीमध्ये ही मालिका रंगणार आहे.

आयर्लंडच्या संघाचा परदेशातला हा पहिला कसोटी सामना असणार आहे. याआधी अफगाणिस्तानने भारतात बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर एकमेव कसोटी सामना खेळला आहे. देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर ही मालिका खेळवली जाणार आहे.