News Flash

भल्याभल्या संघांना जे जमलं नाही, ते अफगाणिस्तानने करून दाखवलं…

अफगाणिस्तानकडून तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा २५ धावांनी पराभव

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तिरंगी टी २० मालिकेत अफगाणिस्तानने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा २५ धावांनी पराभव केला. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचाही पराभव केला होता. त्यामुळे सलग दुसरा विजय मिळवत अफगाणिस्तानने टी २० तिरंगी मालिकेत आपले स्थान भक्कम केले. या विजयासोबतच अफगाणिस्तानने भल्याभल्या संघांना जमला नाही, तो पराक्रम करून दाखवला.

अफगाणिस्तानने बांगलादेशवर मिळवलेला विजय हा त्यांचा टी २० क्रिकेटमधील सलग १२ वा विजय ठरला. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज अशा बलाढ्य संघांनाही हा पराक्रम करणे शक्य झालेले नाही. पण अफगाणिस्तानने हा पराक्रम करून दाखवला आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम करताना अफगाणिस्तानच्या संघाने त्यांचाच २०१६-१७ मधील सलग ११ टी २० विजयांचा विक्रम मोडीत काढला. तसेच, आशिया खंडात खेळण्यात आलेल्या २१ सामन्यांपैकी सर्व सामने जिंकल्याचाही विक्रम त्यांच्या नावे आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय अनुभवी मोहम्मद नबीने सार्थ ठरवला. त्याने ३ चौकार आणि ७ षटकार खेचत ५४ चेंडूत ८४ धावा लगावल्या. त्याला असगर अफगाणची चांगली साथ मिळाली. त्याने ३७ चेंडूत ४० धावांची संयमी खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला २० षटकात त्याला ६ बाद १६४ करता आल्या. मोहम्मद सैफूद्दीनने ४ बळी टिपले.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव मात्र १३९ धावांत आटोपला. बांगलादेशकडून मोदम्मदुल्लाहने सर्वाधिक ४४ धावा केल्या. इतर खेळाडूंना आपल्या फलंदाजीची कमाल दाखवता आली नाही. पहिल्या षटकापासूनच ठराविक अंतराने बांगलादेशने झटपट बळी गमावले. त्यामुळे त्यांना २५ धावांनी पराभूत व्हावे लागले. मोहम्मद नबीला सामनावीर घोषित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:01 pm

Web Title: afghanistan bangladesh zimbabwe t20 tri series afg record most consecutive t20 victories vjb 91
Next Stories
1 स्टीव्ह स्मिथचा अनोखा ‘षटकार’; अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच
2 धमाकेदार स्मिथ! २१ व्या शतकात केला कोणालाही न जमलेला पराक्रम
3 जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचे आव्हान!
Just Now!
X