अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने आयर्लंडला पाच गडी राखून मात देत आपलं वर्ल्डकपचं तिकिट फायनल केलं आहे. झिंबाब्वेमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठीची पात्रता फेरी सुरु आहे. या फेरीत वेस्ट इंडिजने स्कॉटलंडवर विजय मिळवत आपली एंट्री नक्की केली. त्यापाठोपाठ अफगाणिस्ताननेही आयर्लंडला ५ गडी राखून मात देत विश्वचषक स्पर्धेसाठीचा आपल्या टीमचा मार्ग मोकळा केला आहे.

अफगाणिस्तान आणि आयर्लंडच्या या सामन्यात आयर्लंडने टॉस जिंकून २०९ धावा केल्या आणि अफगाणिस्तानच्या संघासमोर २१० धावा करण्याचं आव्हान ठेवलं. मात्र अफगाणिस्तान संघानं ५ गडी गमावत २१३ धावा फटकावल्या आणि वर्ल्ड कपच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने ५० चेंडूच्या बदल्यात ५४ धावांची खेळी केली. तर असगर स्टानिकझाई या फलंदाजाने २९ चेंडूंच्या बदल्यात केलेली ३९ धावांची नाबाद खेळीही निर्णायकी ठरली त्यामुळे आयर्लंडच्या टीमवर अफगाणिस्तानला विजय मिळवणे अत्यंत सोपे गेले.

५० षटकांच्या या सामन्यात आयर्लंडच्या टीमने २०९ धावा केल्या होत्या. तर त्याला उत्तर देत आणि उत्तम खेळ करत अफगाणिस्तानच्या संघाने ५० षटकात २१३ धावांची खेळी केली. टीममधल्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे टीम अफगाणिस्तानचा वर्ल्डकपचा मार्ग मोकळा झाला.