सध्या अफगाणिस्तान प्रिमीयर लीग स्पर्धा ही विविध पराक्रमामुळे गाजत आहे. २००७ मध्ये भारताच्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात लागोपाठ सहा षटकार ठोकून विक्रम केला व केवळ १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. युवराज सिंगने एका षटकात ३६ धावा वसूल केल्या होत्या. त्यापुढे जात अफगाणिस्तानमधील एका फलंदाजाने एका षटकात तब्बल ३७ धावा वसूल केल्या आहे आणि १२ चेंडूत अर्धशतक ठोकले. अफगानिस्तानचा आक्रमक फलंदाज हजरतुल्लाह जजईने १७ चेंडूत ६२ धावांची विस्फोटक खेळी केली.

याच सामन्यात आणखी एक महत्वाची गोष्ट घडली. या सामन्यात दोनही संघाकडून मिळून एकूण ३७ षटकार लागवण्यात आले. यातील बल्क लेजंड्‌सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २४४ धावांचा डोंगर उभा केला. त्यांनी एकूण २३ षटकार लगावले. यात ख्रिस गेलने सर्वाधिक १० षटकार खेचले.

 

 

या आव्हानाचा पाठलाग करताना काबुल जवानन संघाने २० षटकांत सात बाद २२३ धावांपर्यंत मजल मारली. या संघाने एकूण १४ षटकार लगावले. हजरतुल्लाह जजईने सर्वाधिक ७ षटकार लगावले.

 

 

या सामन्यात एकूण ३७ षटकार लागवण्यात आले. हा पराक्रम टी२० सामन्यातील सर्वात अधिक षटकारांचा ठरला. या आधी एका टी२० सामन्यात सर्वाधिक ३४ षटकार लगावण्यात आले होते. कॅरिबियन प्रीमियर लीग २०१८ मध्ये हा पराक्रम करण्यात आला होता.