आशिया चषकानिमित्ताने  मुख्य प्रवाहात खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानने दुसऱ्या लढतीत बांगलादेशवर २२ धावांनी मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ५ बाद ९० परिस्थितीतून अफगाणिस्तानने २५४ धावांची मजल मारली आणि त्यानंतर बांगलादेशला २२२ धावांत गुंडाळले.
अफगाणिस्तानची ५ बाद ९० अशी अवस्था असताना समीउल्ला शेनवारी आणि अश्गर स्टॅनिक्झई यांनी सहाव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी साकारत अफगाणिस्तानला सुस्थितीत नेले. शेनवारीने १० चौकार व एका षटकारासह ८१ धावांची खेळी साकारली. तर अश्गरने ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आणि त्यांना ७२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.