अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) मंगळवारी गुरबचन सिंग रंधावा यांची वरिष्ठ (सीनियर) निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. रंधावा व्यतिरिक्त माजी ऑलिम्पिकपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पी. टी. उषा यांना कनिष्ठ (ज्युनियर) निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहे.

एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, “महासंघाला निर्णय घेण्यात मदत करणारे महान खेळाडू इथे आहेत, याचा एएफआयला अभिमान आहे. निवड समितीतील सर्व सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे.”

निवड समिती:

वरिष्ठः जी.एस. रंधावा (अध्यक्ष), बहादुरसिंग, बहादुरसिंग सग्गू, उदय प्रभू, प्रवीण जॉली, ज्योतिर्मयी सिकंदर, कृष्णा पूनिया, आणि गोपाल सैनी (सदस्य).

कनिष्ठ: पी.टी. उषा (अध्यक्ष), सोमा बिस्वास, आनंद मेनोस, सतबीरसिंग, संदीप सरकारिया, सुनीता राणी, रमा चंद्रन, जोसेफ अब्राहम, हरवंत कौर, एम.डी. वलसामा, कमल अली खान (सदस्य).

पी. टी. उषा यांच्याबाबत..

पी. टी. उषा यांचे पूर्ण नाव पिल्लौलाकांडी थेक्केपेरांबिल उषा असे आहे. भारताच्या महान अ‌ॅथलीट्सपैकी एक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना “ट्रॅक अँड फील्डची क्वीन” म्हणून ओळखले जाते.
पी. टी. उषा एक लांब पल्ल्याच्या उत्कृष्ट धावपटू होत्या. 1980च्या दशकात त्यांनी आशियाई ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांवर वर्चस्व गाजवले. जिथे त्यांनी एकूण 23 पदके जिंकली, त्यापैकी 14 सुवर्णपदके होती.