पहिल्या कसोटीत अवघड परिस्थितीतही पराभव टाळलेल्या आणि आता विजयासाठी आतुर ऑस्ट्रेलियन संघाला रोखण्यासाठी आफ्रिकेने फिरकीचा आधार घेण्याचे ठरवले आहे. रॉरी क्लेनव्हेल्डटला पदार्पणाच्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने आफ्रिकेने फिरकीपटू इम्रान ताहिरला ताफ्यात समाविष्ट केले आहे. स्टेन, मॉर्केल, फिलँडरसह ताहिर ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर आक्रमण गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुखापतग्रस्त जेपी डय़ुमिनीच्या जागी फॅफ डू प्लसीला अंतिम अकरात समाविष्ट करण्यात आले आहे. हशीम अमला आणि जॅक कॅलिस यांच्याकडून आफ्रिकेला पुन्हा एकदा मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. ही कामगिरी सुधारण्याचा एबीचा प्रयत्न आहे.  दुसरीकडे अष्टपैलू शेन वॉटसन या कसोटीतही खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग धावांसाठी झगडत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे.