21 February 2020

News Flash

वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष!

आफ्रिकेच्या महिलांचा आज दुसरा सराव सामना

(संग्रहित छायाचित्र)

 

पूजा वस्त्रकार आणि मानसी जोशी या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय अध्यक्षीय संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा सराव ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार आहे.

पहिला सराव सामना खराब हवामानामुळे रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका महिला संघाला सराव करण्याची संधी मिळाली नाही. मानसी आणि पूजा यांचा मंगळवारपासून रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ वर्षीय शेफाली वर्मा हिलाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या तिघींच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.

अध्यक्षीय संघाची कर्णधार सुषमा वर्मा आणि उपकर्णधार देविका वैद्य चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतील.

सामन्याचे ठिकाण : लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियम, सुरत

सामन्याची वेळ : दुपारी २.३० वा.

First Published on September 22, 2019 1:17 am

Web Title: africa women team face another practice today abn 97
Next Stories
1 झिम्बाब्वेचा कर्णधार मसाकाझाची निवृत्ती
2 जागतिक कुस्ती स्पर्धा : दीपकला आज जागतिक सुवर्णपदकाची संधी
3 भारतीय संघाला बरोबरीची गरज
X