पाकिस्तानने तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या कसोटीसह मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद ६१ अशी मजल मारून आपली एकंदर आघाडी ३७० धावांपर्यंत लांबवली आहे. खेळ थांबला तेव्हा अझर अली आणि युनूस खान अनुक्रमे २१ आणि १६ धावांवर खेळत होते.
सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त २६१ धावांवर गुंडाळत पाकिस्तानने ३०९ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ८७ आणि मायकेल क्लार्कने ४७ धावा काढत चिवट झुंज दिली. परंतु पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करण्यात धन्यता मानली. पाकिस्तानचा संघ तब्बल २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याच्या उंबरठय़ावर आहे.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित