03 June 2020

News Flash

युवराजच्या वडिलांचा यू-टर्न, आता म्हणाले पराभवाला धोनी जबाबदार नाही

धोनी महान खेळाडू - योगराज सिंह

गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंह धोनीविरोधात वक्तव्य करुन चर्चेत आलेल्या योगराज सिंह यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धोनीवर आरोप केले होते. भारतीय संघाच्या पराभवाला धोनी जबाबदार असून आपल्या मुलाला संघात स्थान न मिळण्यामागे धोनी आणि शास्त्री या जोडगोळीचा हात असल्याचं योगराज म्हणाले होते. मात्र योगराज यांनी आपण असं वक्तव्य केलंच नसल्याचं म्हटलं आहे.

“मी असं कधीच म्हणालो नव्हतो. पराभवासाठी मी धोनीला कधीही जबाबदार ठरवलं नव्हतं. तुम्ही चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारलात. गेली अनेक वर्ष धोनी भारतीय संघाचं समर्थपणे नेतृत्व करतो आहे, यात काहीच वाद नाही. तो महान खेळाडू आहे, मी त्याचा चाहता आहे. ज्या पद्धतीने तो संघ हाताळतो, खडतर परिस्थितीत निर्णय घेतो हे वाखणण्याजोगं आहे.” योगराज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान भारतीय संघाच्या आगामी विंडीज दौऱ्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार नाहीये. आगामी दोन महिने तो लष्करी सेवेत असेल. धोनीच्या जागी भारतीय संघात ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून काम पाहिल. ३ ऑगस्टपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 3:32 pm

Web Title: after blaming ms dhoni for indias defeat in world cup yograj singh takes u turn and lavishes praise on him psd 91
Next Stories
1 महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठी खुशखबर; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
2 टाकाऊ मोबाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून बनवली ऑलिम्पिक पदकं
3 धोनीने शब्द पाळला, पॅराशूट रेजिमेंटमधील खडतर प्रशिक्षणाला सुरुवात
Just Now!
X