News Flash

पदक जिंकण्याचा कश्यपचा निर्धार

राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या पारुपल्ली कश्यपने आता दक्षिण कोरियामधील इन्चॉनला होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेतसुद्धा पदक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

| September 15, 2014 12:49 pm

राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या पारुपल्ली कश्यपने आता दक्षिण कोरियामधील इन्चॉनला होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेतसुद्धा पदक जिंकण्याचा निर्धार केला आहे. या स्पध्रेसाठी तीन आठवडय़ांच्या विशेष सराव सत्रानंतर आपला आत्मविश्वास दुणावला असल्याचे कश्यपने या वेळी सांगितले. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत ऐतिहासिक सुवर्णपदक प्राप्त करणारा कश्यप विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत गारद झाला होता. जर्मनीच्या डायटर डॉम्केने त्याचा पराभव केला होता. ‘‘गेले काही दिवस माझी आशियाई स्पध्रेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. आता माझ्यासाठी आणि देशासाठी पदक जिंकेन,’’ असा विश्वास कश्यपने व्यक्त केला.भारतीय महिला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 12:49 pm

Web Title: after commonwealth games parupalli kashyap sets sight at incheon
Next Stories
1 अ‍ॅटलेटिकोचा रिअलला दणका!
2 भारतीय महिला संघाचा मालदीववर दणदणीत विजय
3 सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवणार!
Just Now!
X