News Flash

विश्वचषकाची संधी गमावली, ऋषभ पंतला भारत अ संघात स्थान

विंडीज अ संघाविरुद्ध वन-डे मालिकेत खेळणार

भारतीय विश्वचषकात संधी गमावलेल्या ऋषभ पंतला बीसीसीआयने भारत अ संघात संधी दिलेली आहे. आगामी विंडीज आणि श्रीलंका अ संघाविरुद्ध सामन्यांसाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा केली. यामध्ये विंडीज अ संघाविरुद्ध ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पंतला संघात स्थान देण्यात आलेलं आहे. मनिष पांडे विंडीज अ संघाविरुद्घ भारत अ संघाचं नेतृत्व करेल.

अवश्य वाचा – अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला विश्वचषक संघात स्थान !

याव्यतिरीक्त २०१८ वर्षात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या वृद्धीमान साहानेही पुनरागमन केलं आहे. विंडीजविरुद्ध दोन दिवसीय कसोटी सराव सामन्यांसाठी साहाची यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे. साहाच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने कसोटी संघात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली होती. वन-डे विश्वचषकानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सराव सामन्यांमधून छाप पाडत साहा कसोटी संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

श्रीलंका अ संघाविरुद्ध दोन दिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघ –

इशान किशन (कर्णधार व यष्टीरक्षक), अनमोलप्रित सिंह, ऋतुराज गायकवाड, दिपक हुडा, रिकी भुई, शुभमन गिल, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, वॉशिंग्टन सुंदर, मयांक मार्कंडे, तुषार देशपांडे, संदीप वारियर, इशान पोरेल, प्रशांत चोप्रा

—————————————————————————

श्रीलंका अ संघाविरुद्ध ५ वन-डे सामन्यांसाठी भारत अ संघ –

प्रियांक पांचाळ (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, अनमोलप्रित सिंह, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकू सिंह, शिवम दुबे, के.एस. भारत (यष्टीरक्षक), राहुल चहर, जयंत यादव, आदित्य सरवटे, संदीप वारियर, अंकीत राजपूत, इशान पोरेल

—————————————————————————-

विंडीज अ संघाविरुद्ध ५ वन-डे सामन्यांसाठी भारत अ संघ –

मनिष पांडे (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांड्या, दिपक चहर, नवदीप सैनी, खलिल अहमद, आवेश खान

——————————————————————————

विंडीज अ संघाविरुद्ध पहिल्या दोन सराव सामन्यांसाठी भारत अ संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, हनुमा विहारी, शिवम दुबे, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), के.एस.भारत (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौथम, शाहबाज नदीम, मयांक मार्कंडे, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आवेश खान

अखेरच्या सराव सामन्यासाठी संघात प्रियांक पांचाळ आणि अभिमन्यू इश्वरन यांच्याजागी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 4:13 pm

Web Title: after missing place in indian world cup squad rishabh pant gets chance in india a against west indies
टॅग : Bcci,India A,Rishabh Pant
Next Stories
1 टी २० मुंबई लीगमध्येही रंगणार ‘ड्रीम ११’चा थरार
2 इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक
3 कुलदीपने प्रसारमाध्यमांना झापले, धोनीबद्दलच्या व्यक्तव्याचा विपर्यास
Just Now!
X