नाणेफेक जिंकत आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेत भारताला घरच्या मैदानावर १८ धावांनी पराभूत केले.

गांधी मंडले यांच्या नावे खेळल्या जाणा-या सामन्यांमध्ये आज भारताला पराभूत करत या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.
दमदार सुरवाती नंतर मधल्या फळीतील फलंदाज ढेपाळल्यामुळे भारताला पराभूत व्हावे लागले. मोर्ने र्केल इम्रान ताहीर व ड्यूमिनीच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज फारकाळ टिकू शकले नाहीत. मोर्केलने चार गडी तर ड्यूमिनी व ताहीरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याचप्रमाणे भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले होते. डिकॉकचे शतक व डुप्लेसीस अर्धशतक करण्यात यशस्वी झाला असला तरीही ५० षटकांत ७ गडी गमावत आफ्रिकेने २७० धावा केल्या.
डिकॉक आणि मिलर या सलामी वीरांनी दमदार फलंदाजी करत आफ्रिकेला अर्ध शतक गाठून दिले. मात्र हरभजनच्या फिरकीवर खेळताना रहाणेकडे झेल गेल्याने मिलर बाद झाला. अमित मिश्राने हाशिम आमलाच्या अवघ्या पाच धावा झाल्या असताना त्याला यष्टीचित करत तंबूत पाठवले. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या डी कॉकला प्लेसीसचे सहकार्य लाभल्याने आफ्रिकेने पुन्हा जम बसवत ११८ धावांची भागीदारी केली. पुढे प्लेसीस ६० धावांवर बाद झाल्याने भारतीय गोलंदाज व प्रेक्षकांना हायसे वाटले.
भारतीय गोलंदाजांपैकीहरभजन, अक्षर पटेल व अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला. तर,मोहित शर्मा ने दोन गडी बाद करूनही भारतीय फलंदाजांना २७० धावांचा पल्ला गाठता न आल्याने पराभूत व्हावे लागले.