News Flash

सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणही करोना पॉझिटिव्ह

ट्विट करून दिली माहिती

युसूफ पठाण. (संग्रहित छायाचित्र)

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघातील दोन माजी खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.

शनिवारी (२७ मार्च) रात्री साडेआठ वाजता युसूफ पठाणने ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ““माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर करोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं युसूफने ट्विट करून म्हटलं आहे.

सचिनही होम क्वारंटाइनमध्ये…

सचिनने करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. तसंच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचंही सांगितलं होतं. “करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचं मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं सचिन म्हणाला होता.

सचिन तेंडुलकरबरोबरच युसूफ पठाणही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. दोघांनीही इंडिया लिजेंड्सला संपूर्ण स्पर्धेत सामने जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला १४ धावांनी हरवून चषकावर नाव कोरलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 8:41 am

Web Title: after sachin tendulkar former india cricketer yusuf pathan tests positive for covid 19 with mild symptoms bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका : भारताची मालिकाविजयाची धुळवड?
2 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : सुवर्णओघ सुरूच
3 रविवार विशेष : विषाणूवर्षानंतरची धगधग!
Just Now!
X