News Flash

WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर

भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे. 

World Test Championship : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी मालिकाते पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आतापर्यंत भारतीय संघानं पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारलं आहेत. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ इतकी आहे.

आणखी वाचा- ऋषभ पंतनं करून दाखवलं; टीकाकारांना बॅटनं दिलं चोख उत्तर

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही पाच कसोटी मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे. न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:02 pm

Web Title: after the hard fought win at the gabba india move to the no1 spot in icc world test championship standings nck 90
Next Stories
1 शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…
2 ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास
3 Ind vs Aus : भारताने सामना जिंकल्यानंतर Google चे CEO ही झाले खूष; ‘ते’ खास ट्विट झालं व्हायरल
Just Now!
X