News Flash

मुस्लिम धर्म स्वीकार, स्वर्ग मिळेल! पाक क्रिकेटपटूचा श्रीलंकेच्या दिलशानला सल्ला

इस्लामी धर्मप्रसाराचे वारे आता थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत येऊन पोहचल्याने सध्या मोठी खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याला मैदानावरच मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा सल्ला

| September 4, 2014 02:22 am

इस्लामी धर्मप्रसाराचे वारे आता थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत येऊन पोहचल्याने सध्या मोठी खळबळ उडाली आहे.  श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याला मैदानावरच मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देऊन पाकिस्तानच्या अहमद शहजाद या क्रिकेटपटूने वाद ओढावून घेतला आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात हा प्रकार घडला. सामना संपल्यानंतर मैदानातून परतत असताना अहमद शहजादने दिलशानच्या जवळ जाऊन तू मुस्लिम नसशील तर, हा धर्म स्वीकार तुला थेट स्वर्गात जागा मिळेल असा सल्ला देऊ केला आणि त्यानंतर पुन्हा पुढे जाऊन, नाहीतर तयार रहा असेही शहजाद खोचकपणे दिलशानला म्हणाला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
झालेल्या प्रकरणाची पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दखल घेतली असून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाक क्रिकेट मंडळाने शहजादला लाहोर येथील कार्यालयात बोलावून त्याच्याकडे झालेल्या प्रकराचे स्पष्टीकरण मागितले. दरम्यान, माझी दिलशानसोबत ही खासगी चर्चा होती. त्यापेक्षा अधिक काही नाही असे स्पष्टीकरण शहजादने दिले आहे. अद्याप या प्रकरणाबद्दल श्रीलंका क्रिकेट मंडळाकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापक अकबर यांनी सांगितले आहे.
वडील मुस्लिम आणि आई बौद्ध अशी दिलशानची पार्श्वभूमी आहे. त्याच्या जन्माच्यावेळी दिलशानचे नाव तुवान मोहम्मद दिलशान असे होते. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिलशानने आपली ओळख मुस्लिम न ठेवता सिंहली बौद्ध ठेवण्याचा निर्णय घेऊन सध्याचे तिलकरत्ने नाव कायम ठेवण्याचा निर्धार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:22 am

Web Title: ahmed shehzad asks tillakaratne dilshan to embrace islam
Next Stories
1 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविच, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत
2 सायना व गोपीचंद यांच्यात मतभेद
3 गोपीचंद यांचे मौन
Just Now!
X