News Flash

उत्तेजक द्रव्य चाचणीत अहमद शेहजाद दोषी, पाक बोर्डाकडून निलंबनाची टांगती तलवार

शेहजादच्या शिक्षेबद्दल निर्णय लवकरच

अहमद शेहजाद (संग्रहीत छायाचित्र)

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. आयसीसीच्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शेहजादवर सध्या ३ ते ६ महिन्यांच्या बंदीची शिक्षा होऊ शकते. २६ वर्षीय शेहजादने आतापर्यंत पाकिस्तानकडून १३ कसोटी, ८१ वन-डे आणि ५७ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची एक समिती शेहजादची चौकशी करणार असून यानंतर त्याच्या शिक्षेबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं समजतंय.

प्राथमिक चाचणीमध्ये शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. मात्र त्याच्या शिक्षेबद्दल निर्णय घेण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्येही पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. यावेळी यासिरलाही निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 6:05 pm

Web Title: ahmed shehzad fails dope test risks suspension
टॅग : Icc,Pcb
Next Stories
1 बॉल टॅम्परिंग प्रकरणातील शिक्षेला दिनेश चंडीमलचं आव्हान
2 जाणून घ्या पुढील ५ वर्षांचं भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक
3 महिला क्रिकेटमध्ये ‘रन बरसे रे’! इंग्लंडचा टी-२० मध्ये २५० धावांचा विक्रमी डोंगर
Just Now!
X