14 August 2020

News Flash

भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीला पुन्हा मुदतवाढ

भारतीय बॉक्सिंगपटूंच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या मार्गातील अडथळे दूर होण्याच्या मार्गावर आहेत.

| May 13, 2016 03:33 am

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय बॉक्सिंगपटूंच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या मार्गातील अडथळे दूर होण्याच्या मार्गावर आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) भारतात नवीन बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यामुळे नव्या संघटनेला नोंदणी करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) स्थापनेसाठी एआयबीएने याआधी १४ मेपर्यंत मुदत दिली होती, परंतु त्यात मुदतवाढ करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली आहे. ‘‘बीएफआयच्या स्थापनेसाठी सुरू असलेली प्रगती पाहून एआयबीएने मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी आम्हाला अद्याप तारीख सांगितलेली नाही, परंतु मी शाश्वती देऊ इच्छितो की आमच्या बॉक्सिंगपटूंना ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून कोणी रोखू शकत नाही,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘भारतीय बॉक्सिंग समितीतील प्रगती पाहून एआयबीए समाधानी आहेत. आम्ही सर्वानी एकत्र येऊन नवी संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले आहेत आणि सध्याच्या घडीला ३६ पैकी ३५ राज्य संघटनांनी महासंघामध्ये नोंदणी केलेली आहे.’’ शिवा थापा (५६ किलो) हा रिओ ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय बॉक्सिंगपटू आहे. अजून दोन पात्रता फेरी शिल्लक आहेत.
गेल्या महिन्यात कोलकाता येथे झालेल्या बैठकीनंतर नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचालींना वेग मिळाला. क्रीडा मंत्रालयानेही ना हरकत प्रमाणपत्र देण्याची आणि
निवडणुकीला निरीक्षक पाठवण्याची तयारी दर्शवली. ‘‘बीएफआयच्या संविधानानुसार आम्हाला २१ दिवसांची नोटीस आवश्यक आहे आणि एआयबीएच्या नियमानुसार त्यांना एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यामुळे या गोष्टीचा विचार केल्यास ही निवडणूक या महिन्याअखेरीस किंवा पुढील महिन्यात होईल,’’ असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 3:33 am

Web Title: aiba extends deadline for boxing federation elections
Next Stories
1 बॅडमिंटनने आयुष्य समृद्ध केले – नंदू नाटेकर
2 प्रीती झिंटाने अपमान केला नाही – बांगर
3 सुशीलला वगळल्याचा महासंघाकडून इन्कार
Just Now!
X