नवी संघटना स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मुदतवाढ
नवीन राष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारताला दिलेल्या मुदतीत वाढ केली आहे. बॉक्सिंग इंडिया (बीआय) या राष्ट्रीय संघटनेच्या निलंबनानंतर हंगामी समिती भारतात बॉक्सिंगचा कारभार सांभाळत होती. नवीन संघटना स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेली ३१ मार्चपर्यंतची मुदत १४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंना रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत तिरंग्याखाली खेळण्याची संधी मिळणार आहे. संघटना स्थापनेसाठी हंगामी समिती एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्याची शक्यता आहे.