भारताच्या अजय जयरामने आपली विजयी घोडदौड कायम राखत स्विस ग्रां प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आनंद पवारचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आल़े  
जयरामने तिसऱ्या फेरीतील लढतीत तैपेईच्या त्झू वेई वांगवर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला़  ३५ मिनिटांच्या या लढतीत वांगने जयरामला कडवे आव्हान दिले, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही़  जयरामला पुढील सामन्यात सकाईशी दोन हात करावे लागतील़ दुसऱ्या लढतीत जपानच्या काझुमासा सकाईने पवारचा  १९-२१, २१-१९, २१-१५ असा पराभव केला़
सायना दुसऱ्या स्थानी
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.  पी. व्ही. सिंधू  चौथ्या स्थानी स्थिर आहे.