08 July 2020

News Flash

अजिंक्यने विचारलं, तुम्हाला वडापाव कसा खायला आवडतो?? सचिननेही दिलं भन्नाट उत्तर…

सोशल मीडियावर रंगला संवाद

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे गेले काही दिवस आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात अजिंक्य कसोटी मालिकेत खेळण्यासाठी मैदानात उतरले. त्याआधी अजिंक्यने आपली पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत मनसोक्स वेळ घालवला. शुक्रवारी अजिंक्य भारत अ संघाकडून खेळण्यासाठी न्यूझीलंडला रवाना होईल.

त्याआधी अजिंक्यने आपल्या ट्विटर अकाऊंटवर वडापाव खातानाचा एक फोटो टाकला. या फोटोवर अजिंक्यने तुम्हाला वडापाव कसा खायला आवडतो?? असा प्रश्नही आपल्या चाहत्यांना विचारला…

अजिंक्यच्या या फोटोवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्याला वडापाव कसा आवडतो याबद्दल सांगितलं.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळेल. यानंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 3:23 pm

Web Title: ajinkya ask about vada pav on his twitter sachin gives nice reply to him psd 91
टॅग Sachin Tendulkar
Next Stories
1 रोहित-अजिंक्यची ‘फॅमिली डिनर डेट’; या विषयावर रंगल्या गप्पा
2 Video : पाहा, केदार जाधवचं पुण्यातलं अलिशान घर
3 भारत दौऱ्यावर येण्याआधी वॉर्नरचा ‘टीम इंडिया’ला खास संदेश
Just Now!
X