News Flash

अर्धशतक पूर्ण करताना जाडेजामुळे शतकवीर रहाणे धावबाद, यानंतर मैदानात घडलं असं काही….

'त्या' कृतीमुळे नेटकऱ्यांकडून अजिंक्य रहाणेचं पुन्हा कौतुक

मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात कांगारुंवर १३१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. रहाणेने दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रातच आपलं शतक पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात दोन्ही फलंदाजांनी सावध सुरुवात केली.

अष्टपैलू रविंद्र जाडेजा आपल्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्याला एक धाव घेताना नाकीनऊ आणले. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत असताना संभ्रमामुळे अजिंक्य रहाणे धावबाद झाला. परंतू यानंतरही अजिंक्य रहाणेने निराश न होता जाडेजाला प्रोत्साहन देत माघारी परतण पसंत केलं.

आणखी वाचा- मेलबर्नचं मैदान अजिंक्यने गाजवलं, विराट कोहलीला टाकलं मागे

आणखी वाचा- अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

अजिंक्य रहाणे माघारी परतल्यानंतर रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर तो देखील फारकाळ तग धरु शकला नाही. मिचेल स्टार्कने जाडेजाला ५७ धावांवर कमिन्सकरवी झेलबाद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 8:25 am

Web Title: ajinkya rahane encourage ravindra jadeja after he gets run out wins heart of cricket fans psd 91
Next Stories
1 अर्धशतकी खेळीत रविंद्र जाडेजा चमकला, कपिल देव यांच्याशी बरोबरी
2 बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याची भारताला चांगली संधी, अजिंक्यचं शतक जुळवून आणणार योगायोग
3 Ind vs Aus : टीम इंडियाची पहिल्या डावात त्रिशतकी मजल, कांगारुंवर १३१ धावांची आघाडी
Just Now!
X