करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला देशवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देशभरातील विविध शहरांमध्ये रात्री ९ वाजता लाईट बंद करुन लोकांनी दिवे आणि मोबाईलचे फ्लॅश चालू करत आपला पाठींबा दर्शवला. अनेक सेलिब्रेटीही यात सहभागी झाले होते. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घराबाहेर एक दिवा लावला.

हे दिवसही जातील ! या आशयाची कॅप्शन देत अजिंक्यने आपला दिवा लावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं. राजकीय नेत्यांनीही मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.