28 November 2020

News Flash

अजिंक्य रहाणे लग्नाच्या बेडीत

भारतीय संघाचा युवा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने शुक्रवारी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या इनिंगला सुरूवात केली आहे.

| September 26, 2014 04:58 am

भारतीय संघाचा युवा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने शुक्रवारी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. संयमी आणि शैलीदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱया अजिंक्यचे मन मुंबईच्या राधिकाने जिंकले. अजिंक्य राधिकासोबत पारंपारिक पद्धतीने विवाहबद्ध झाला. हे दोघेही मुंबईतील मुलुंड येथे राहतात आणि विशेष म्हणजे, अजिंक्य आणि राधिकाचं हे अरेंज मॅरेज आहे.
रहाणेने भारतासाठी आतापर्यंत १० कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडदौऱयात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय इंग्लंड गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करत होते तेव्हा रहाणेने भारताची बाजू सांभाळत दमदार कामगिरी करत इंग्लंडची गोलंदाजी भेदून काढली होती. लॉर्डवरील ऐतिहासिक वारसा असलेल्या खेळपट्टीवर रहाणेने शानदार शतक ठोकून भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 4:58 am

Web Title: ajinkya rahane marries radhika
Next Stories
1 इतिसी हसी, इतिसी खुशी..
2 हॉकीत भारत पाकिस्तानकडून पराभूत
3 सायना उपांत्यपूर्व फेरीत, सिंधूचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X