News Flash

अजिंक्य रहाणेने सपत्नीक नरसोबावाडीला दिली भेट

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ नरसोबावाडीला सपत्नीक भेट दिली.

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ नरसोबावाडीला सपत्नीक भेट दिली. नरसोबावाडी हे दत्तदेवस्थान आहे. अजिंक्यने नरसोबावाडीमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी शरद उपाध्ये यांच्या वेदभवनमध्ये जाऊन दर्शन घेतले.

शरद उपाध्ये यांच्या सामाजिक कार्याने आपण भारावून गेल्याचे अजिंक्यने सांगितले. देवस्थानाच्या व्यवस्थापनात आपल्याला काही त्रुटी जाणवल्या त्या आपण उपाध्येंच्या कानावर घालू असे त्याने सांगितले. शरद उपाध्ये हे अजिंक्य रहाणेचे मार्गदर्शक आहेत.

अजिंक्यने त्याच्या फेसबुक पोस्टमधून नरसोबावाडीच्या भेटीचा अनुभव कसा होता त्याची माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली तालुक्यात नरसोबावाडी आहे. येथे कृष्णा नदीच्या तीरावर औदुंबराच्या वृक्षाच्या छायेखाली श्री नृसिंहसरस्वती मंदिर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 9:41 pm

Web Title: ajinkya rahane narsoba wadi visit
Next Stories
1 IND vs WI : भारतीय संघांची घोषणा; शिखर धवन बाहेर, पृथ्वी शॉ-मयांक अग्रवालला संधी
2 IND vs WI : शिखरचा पत्ता कट; रोहितचे पुनरागमन, पृथ्वीचे कसोटी पदार्पण?
3 कर्णधार म्हणून माझ्यामध्ये एमएस धोनीसारखे गुण – रोहित शर्मा
Just Now!
X