News Flash

मेलबर्नचं मैदान अजिंक्यने गाजवलं, विराट कोहलीला टाकलं मागे

रहाणेच्या शतकी खेळामुळे भारताची सामन्यावर पकड

मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गारद केल्यानंतर भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारत पहिल्या डावात १३१ धावांची भक्कम आघाडी घेतली.

अवश्य वाचा – अर्धशतक पूर्ण करताना जाडेजामुळे शतकवीर रहाणे धावबाद, यानंतर मैदानात घडलं असं काही….

११२ धावांची खेळी करुन अजिंक्य रहाणे धावबाद झाला. यादरम्यान मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अजिंक्य दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. विराट कोहली (३१६ धावा) ला मागे टाकत ५ डावांत ३४४ धावांसह रहाणेने दुसरं स्थान पटकावलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर अजिंक्य रहाणेची सरासरी ही ८३.५० ची आहे. या यादीत सचिन तेंडुलकर ४४९ धावांसह पहिल्या स्थानी आहे.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५ बाद २७७ पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

अवश्य वाचा – बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याची भारताला चांगली संधी, अजिंक्यचं शतक जुळवून आणणार योगायोग  

भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. कांगारुंकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लियॉनने ३-३, पॅट कमिन्सने २ तर जोश हेजलवूडने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 9:30 am

Web Title: ajinkya rahane pips virat kohli becomes indias second highest run scorer at iconic melbourne cricket ground psd 91
Next Stories
1 रहाणेच्या शतकी खेळीवर कोहलीचं ट्विट
2 अर्धशतक पूर्ण करताना जाडेजामुळे शतकवीर रहाणे धावबाद, यानंतर मैदानात घडलं असं काही….
3 अर्धशतकी खेळीत रविंद्र जाडेजा चमकला, कपिल देव यांच्याशी बरोबरी
Just Now!
X