IND vs AUS : विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर भारतीय संघानं खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला खास गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे अजिंक्य आणि टिमचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सामन्यानंतर अजिंक्य रहाणेनं १०० वा सामना खेळणाऱ्या नॅथन लायन याला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी भेट देत त्याचा खास सन्मान केला. या प्रसंगाची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू इरफान पठाण आणि लक्ष्मण यांनी या कृतीचं स्वागत करत भारतीय टिमचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर पाँटिगला विश्वासच नाही, म्हणाला….

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची केली ‘बोलती बंद’, म्हणाला “आयुष्यभर आठवण…”

१०० व्या कसोटी सामन्यात नॅथन लायनला याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दोन्ही सामन्यात नॅथन लायनला फक्त तीन विकेट घेण्यात यश मिळालं. नॅथन लायन यानं १०० कसोटी सामन्यात ३९९ विकेट घेतल्या आहेत. मायदेशात खेळलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत नॅथन लायन ४०० बळींचा पल्ला पार करेल असं भाकित केलं गेलं होतं. मात्र, भारतीय फलंदाजांनी नॅथन लायनला फारशी संधी दिली नाही.