06 July 2020

News Flash

आता अजिंक्य रहाणेही म्हणतोय; मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन !

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अजिंक्य सज्ज

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठ्या कालावधीनंतर आपला हरवलेला फॉर्म पुन्हा एकदा मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या अजिंक्यने विंडीज दौऱ्यातून चांगलं पुनरागमन केलं. कसोटी संघाचा अविभाज्य भाग असलेल्या अजिंक्यला आपलं वन-डे संघातलं स्थान मात्र टिकवता आलेलं नाहीये. मात्र अजुनही अजिंक्य आपल्या भारतीय वन-डे संघातील पुनरागमनाबद्दल आश्वस्त आहे.

“मला कसोटी सामन्यांमध्ये चांगला खेळ करायचा आहे, धावा काढणं सुरु ठेवायचं आहे आणि मला विश्वास आहे की मी वन-डे संघात पुनरागमन करेन. तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे यावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही वर्तमानात राहणं आवश्यक असतं, कसोटी सामन्यात माझं संघाच्या विजयात योगदान असेल तर मी वन-डे संघात नक्कीच पुनरागमन करेन.” बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी रहाणे पत्रकारांशी बोलत होता.

२०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्य रहाणे आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. तर गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्यने अखेरचा वन-डे सामना खेळला. यानंतर त्याला भारतीय संघात आपलं स्थान टिकवता आलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात अजिंक्य वन-डे संघात कधी पुनरागमन करतोय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 9:10 am

Web Title: ajinkya rahane says he is confident of making a comeback in odi side with consistency in tests psd 91
Next Stories
1 Video : जेव्हा इंदूरच्या रस्त्यांवर विराट कोहली ‘गली क्रिकेट’मध्ये रमतो
2 गुलाबी चेंडूला फटकावण्याची घाई करू नये!
3 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा विजयी चौकार!
Just Now!
X