24 November 2020

News Flash

IPL 2020 : बाबांसोबत जाण्यासाठी लहानग्या आर्याचा हट्ट, अजिंक्यच्या बॅगेत बसून तयार

अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केला फोटो

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर सर्व संघ कसून तयारीला लागले आहेत. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थीती लक्षात घेता यंदाची स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये भरवण्यात येणार आहे. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. आपल्या नवीन संघात सहभागी होण्यासाठी अजिंक्य सध्या तयारी करतोय.

पण या तयारीदरम्यान अजिंक्यची लहानगी मुलगी आर्या थेट त्याच्या किट बॅगमध्ये जाऊन बसली. आयपीएल कँपला निघण्याआधी अजिंक्यने आर्यासोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाबांची सपोर्टर यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीला पाठींबा देण्यासाठी सज्ज असल्याचं अजिंक्यने म्हटलंय.

गेल्या काही वर्षांपासून अजिंक्य राजस्थान रॉयल्स संघाचा हिस्सा होता. परंतू तेराव्या हंगामासाठी Player Transfer Window अंतर्गत अजिंक्य दिल्लीच्या संघात दाखल झाला आहे. आयपीएल आटोपल्यानंतर भारतीय संघ तिकडूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे पुढचे काही महिने अजिंक्य आपल्या परिवारापासून दूर राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 8:06 pm

Web Title: ajinkya rahane share adorable picture with his daughter aarya before leaving for ipl 2020 psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO : अबब… असा ‘षटकार’ कधी तुम्ही पाहिलाय का?
2 ‘त्या’ कारचा मालक शोधून द्या!; सचिनचं चाहत्यांना आवाहन
3 Dream 11 ची स्पॉन्सरशिप फक्त IPL 2020 पुरतीच – BCCI चा निर्णय
Just Now!
X