News Flash

मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे

चौथ्या डावात केला मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. या विजयाबद्दल बोलताना अजिंक्यने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

ऋषभ पंतने ‘करून दाखवलं’; टीकाकारांना बॅटनं दिलं चोख उत्तर

“आजचा हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा विजय शब्दात कसा वर्णन करावा हे मला माहिती नाही. आमच्या संघातील साऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे. आम्हाला आमच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच आम्हीच ठरवलं की जिंकण्यासाठी खेळायचं. मग मी माझ्या पद्धतीने खेळलो, कारण आमच्याकडे ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल हे दोघे शिल्लक होते. पुजाराला तर या विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. त्याने दडपणाचा चांगला सामना केला आणि त्यानंतर पंतने तर सामन्याचा शेवट अगदी उत्तम केला”, असं अजिंक्य म्हणाला.

Videos: चेतेश्वर पुजारा The Wall- कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुरून उरणारा भारतीय!

“आमच्यासमोर मुख्य मुद्दा होता तो म्हणजे २० बळी मिळवण्याचा. आम्ही पाच गोलंदाजांसह खेळत होतो आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा योग्य फायदा मिळाला. वॉशिंग्टन सुंदरमुळे आमच्या संघात समतोल कायम राहिला. सिराजने केवळ दोन सामने खेळले होते, सैनी आणि शार्दुलने एकमेव सामना खेळला होता. नटराजन तर नवखाच होता. पण पहिल्या सामन्यात काय घडलं याची आम्ही अजिबात चर्चा केली नाही. आम्ही केवळ मैदानात जाऊन खेळावर लक्ष दिलं. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावलं. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला”, असं अजिंक्यने सांगितलं.

शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

आपल्या शंभर कसोटी पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याचंही त्याने अभिनंदन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:25 pm

Web Title: ajinkya rahane shares secret behind winning test series team india against australia ind vs aus vjb 91
Next Stories
1 दादा खुश हुआ… BCCI अध्यक्षांनी विजयानंतर भारतीय संघाला दिला एक सुखद धक्का
2 WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर
3 शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…
Just Now!
X