इंग्लंड लायन्स संघाविरोधात होणाऱ्या आगामी वन-डे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. मात्र अजिंक्य हा पहिल्या 3 वन-डे सामन्यांसाठीच कर्णधार म्हणून काम पाहणार असून चौथ्या व पाचव्या वन-डे सामन्याचं नेतृत्व महाराष्ट्राच्या अंकित बावनेकडे देण्यात आलेलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने याचसोबत दोन दिवसाच्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची घोषणा केली असून इशान किशनकडे संघाचं नेतृत्व सोपवलेलं आहे. 23 जानेवारीपासून वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून, दोन दिवसीय सराव सामना 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

पहिल्या 3 वन-डे सामन्यांसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), अनमोलप्रीत सिंह, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, अंकित बावने, इशान किशन (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, अक्षर पटेल, मयांक मार्कंडे, जयंत यादव, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, दिपक चहर, नवदीप सैनी</p>

चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे –

अंकित बावने (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, सिद्धेश लाड, हिम्मत सिंह, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिपक हुडा, अक्षर पटेल, राहुल चहल, जयंत यादव, नवदीप सैनी, आवेश खान, दिपक चहर, शार्दुल ठाकूर

दोन दिवसीय सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघ पुढीलप्रमाणे –

इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षथ रेड्डी, ध्रुव शौरी, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकु सिंह, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, अनिकेत चौधरी, अंकित राजपूत, राजेश मोहंती