२३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या देवधर चषकासाठी बीसीसीआयने आज संघांची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षात स्पर्धेच्या प्रकारात बदल करण्यात आलेला आहे. विजय हजारे चषकातील विजेत्या संघाला यंदा स्पर्धेत सहभागी होता येणार नसून, याऐवजी भारत अ, ब आणि क संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने आज यासंदर्भातला निर्णय घेतला आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेकडे या स्पर्धेत भारत क संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत रविचंद्र आश्विन आणि पृथ्वी शॉ यांनाही या स्पर्धेत स्थान देण्यात आलं आहे.

देवधर चषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे –

भारत अ – दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, अनमोलप्रीत सिंह, अभिमन्यु इश्वरन, अंकित बावणे, नितीश राणा, करुण नायर, कृणाल पांड्या, रविचंद्रन आश्विन, श्रेयस गोपाल, शम्स मुलानी, मोहम्मद सिराज, धवल कुलकर्णी, सिद्धार्थ कौल.

भारत ब – श्रेयस अय्यर (कर्णधार), मयांक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, प्रशांत चोप्रा, हनुमा विहारी, मनोज तिवारी, अंकुश बैंस (यष्टीरक्षक), रोहित रायडू, कृष्णप्पा गौथम, मयांक मार्कंडे, शाबाद नदीम, दिपक चहर, वरुण अॅरोन, जयदेव उनाडकट</p>

भारत क – अजिंक्य रहाणे (कर्णधार), अभिनव मुकुंद, शुभमन गिल, रविकुमार समर्थ, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, पप्पु रॉय, नवदीप सैनी, रजनीश गुरबानी, उमर नाझीर