संपूर्ण जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात आहे. प्रत्येक घरात वडिलांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही.याची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही आजच्या दिवशी आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत. आई आणि बाबांसोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर करत अजिंक्यने, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं असं म्हटलं आहे. My father always taught me to believe in myself and inspired me to go further and beyond. Happy Father’s Day Baba!#HappyFathersDay2020 pic.twitter.com/nBgIEJjdvm— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 21, 2020 आपल्याला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे वडिलांचा मोठा हात असल्याचं अजिंक्यने याआधी अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. लहानपणी डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून मी योग्य रितीने जातोय की नाही हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे असं अजिंक्य म्हणाला होता.