दिल्लीचा पराभव करत मुंबईनं पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. आयपीएल संपल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला आयपीएलचा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा माजी खेळाडू अजित आगरकर यांचाही समावेश झाला आहे. धोनी, रोहित, राहुल, राशिद खान आणि विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना आपल्या अंतिम एकदशमध्ये सहभागी केलं नाही.

आगरकरने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आपल्या आयपीएल संघाची निवड केली आहे. यामध्ये डेविड वॉर्नर आणि शिखर धवन यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी इशान किशानला पसंती दिली आहे. तर चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. पाचव्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंजलाज डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या आणि स्टॉयनिस यांची निवड केली .

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: मयंक यादवने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान

रबाडा आणि बुमराह यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. तर चहल आणि चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची धुरा सोपवण्यात आली आहे.

आगरकरचा सर्वोत्तम आयपीएल संघ –
डेविड वॉर्नर, शिखर धवन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती