News Flash

आकाश भारताचा ६६वा ग्रँडमास्टर

चेन्नईच्या आकाशचे ‘फिडे’ क्रमवारीत २४९५ रेटिंग आहे

संग्रहित छायाचित्र

 

तमिळनाडूचा जी. आकाश भारताचा ६६वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) ग्रँडमास्टर म्हणून आकाशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

चेन्नईच्या आकाशचे ‘फिडे’ क्रमवारीत २४९५ रेटिंग आहे. ‘‘भारताच्या ग्रँडमास्टरच्या यादीत मला स्थान मिळाले याचा अभिमान आहे. यापुढेही मेहनत घेणार असून लवकरच २६०० रेटिंग करायचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायचे असल्याने बुद्धिबळ काही महिने खेळत नव्हतो. मात्र २०१८मध्ये बुद्धिबळात पुनरागमन केले आणि आता ग्रँडमास्टर झालो,’’ असे आकाशने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:02 am

Web Title: akash is the 66th grandmaster of india abn 97
Next Stories
1 Video : क्रिकेटचं पुनश्च हरिओम
2 ‘या’ तीन व्यक्तींमुळे मी आज यशस्वी, सचिनने मानले आपल्या गुरुंचे आभार
3 आयपीएलमधून येणारा पैसा खेळाडूंसाठी वापरला जातो, गांगुली-जय शहांसाठी नाही !
Just Now!
X