भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असल्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) मंकीगेट वादाकडे दुर्लक्ष करून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाकडे आशेने पाहते, अशा शब्दांत शोएब अख्तरने टीका केली. ‘‘क्रिकेटमधील आर्थिक असमानतेला ‘बीसीसीआय’ आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ जबाबदार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा झाली असती. परंतु ती स्पर्धा होणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. विश्वचषक नाही झाला तरी चालेल, पण ‘आयपीएल’ची प्रतिमा डागाळता कामा नये, हीच काळजी दोन्ही मंडळे घेत आहेत,’’ असे अख्तरने सांगितले.