२२ ते ३० जूनरोजी दुबईत होणाऱ्या, ‘दुबई मास्टर कबड्डी’ स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघाने १४ जणांच्या भारतीय चमूची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. अपेक्षेप्रमाणे यंदाच्या राष्ट्रीय संघातही उत्तरेकडच्या राज्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. मात्र राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या अवघ्या २ खेळाडूंना संघात जागा मिळवता आलेली आहे. रिशांक देवाडीगा आणि गिरीश एर्नेक या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आलेलं आहे.

असा असेल भारताचा राष्ट्रीय कबड्डी संघ –

गिरीश एर्नाक, सुरिंदर नाडा, मोहित छिल्लर, राजु लाल चौधरी, सुरजित नरवाल, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, अजय ठाकूर, रिशांक देवाडीगा, मोनू गोयत, रोहित कुमार, मनजीत छिल्लर, संदीप नरवाल, दिपक निवास हुडा

राखीव खेळाडू – मणिंदर सिंह, सचिन तवंर