News Flash

अपघातामुळे अक्षय गिरप उपांत्य फेरीला मुकणार

कर्नाटकविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्य फेरीसाठी फिरकीपटू अक्षय गिरपला अपघातातील दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे.

| February 24, 2015 01:02 am

कर्नाटकविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्य फेरीसाठी फिरकीपटू अक्षय गिरपला अपघातातील दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. उपान्त्य फेरीचा सामना २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे होणार आहे.
‘‘उपांत्य फेरीसाठी रविवारी संघनिवडीनंतर अक्षयला संधी देण्यात आली होती. पण दुचाकी वाहनावरून जाताना अक्षयचा अपघात झाला असून तो उपांत्य फेरीच्या लढतीसाठी संघासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याच्याऐवजी संघामध्ये ऑफ स्पिनर मैराज खानचा समावेश करण्यात आला आहे,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुफियॉन शेख, शार्दूल ठाकूर, निखिल पाटील, अखिल हेरवाडकर, श्रीदीप मंगेला, विल्किन मोटा, तुषार देशपांडे, मैराज खान, हरमीत सिंग आणि बलविंदरसिंग संधू. प्रशिक्षक : प्रवीण अमरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 1:02 am

Web Title: akshay girap injured in bike accident will miss ranji semifinals
Next Stories
1 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या नियमांमध्ये सुधारणा
2 सोमदेवला विजेतेपद
3 रांची रेज अजिंक्य
Just Now!
X