श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती धिमी राखल्याबद्दल इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला एका एकदिवसीय सामन्यातून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम वजा करण्यात आली आहे. वर्षभरात षटकांची धावगती कमी राखल्याबद्दल कुक दुसऱ्यांदा दोषी सापडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई केली आहे, असे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी सांगितले.    
दरम्यान, हम्बानटोटा येथे जोस बटलर (५५) आणि जो रूट (४८) यांनी नाबाद ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडला श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पाच विकेट राखून जिंकून दिला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत ८ बाद २४२ धावा केल्या. इंग्लंडने ३३.४ षटकांत ५ बाद २३६ धावा करत विजय संपादन केला.