News Flash

अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा

अंतिम सामन्यात सितसिपासला चारली धूळ

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यंदाच्या मेक्सिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटतकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवने ग्रीसचा टॉप सीडेड टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6(7-3) अशी धूळ चारली.

 

तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सामना तब्बल 2 तास आणि 17 मिनिटे रंगला होता. ज्वेरेवचा हा 14वा एटीपी किताब आहे. मागील वर्षी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा धक्का बसला होता. तर, 2019च्या एटीपी 500 स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसकडून मात खावी लागली होती.

विजेतेपदानंतर ज्वेरेवची प्रतिक्रिया

मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, ”मी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चांगले खेळत नसल्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. माझा मार्ग शोधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि मी पहिला सेट जिंकला.”

“जेव्हा मला दुसर्‍या सेटमध्ये संधी मिळाली तेव्हा मी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. अव्वल खेळाडू सहसा तुम्हाला दुसरा संधी देत ​​नाहीत. मला असे वाटते की, टायब्रेकमध्ये मी चांगले काम केले. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे”, असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 10:26 am

Web Title: alexander zverev beat stefanos tsitsipas in a thrilling mexican open final adn 96
Next Stories
1 दुखापतीमुळे आर्चरची माघार
2 जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका : भारत लिजंड्सला जेतेपद
3 भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका : भारताचा सलग दुसरा पराभव
Just Now!
X