News Flash

लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

फ्रान्सच्या मार्क कॅल्जोऊने २१-१७, १६-२१, २१-१७ अशा फरकाने पराभव केला, पण लक्ष्यने ५५ मिनिटे झुंज दिली.

लक्ष्यचे आव्हान संपुष्टात
(संग्रहित छायाचित्र)

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

युवा लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी संघर्षपूर्ण उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर पराभव पत्करला. त्यामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

फ्रान्सच्या मार्क कॅल्जोऊने २१-१७, १६-२१, २१-१७ अशा फरकाने पराभव केला, पण लक्ष्यने ५५ मिनिटे झुंज दिली.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डीची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. नेदरलँड्सच्या सेलेना पीक आणि शेरील सीनेन जोडीने जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर असलेल्या अश्विनी-सिक्कीला ३९ मिनिटांत २४-२२, २१-१२ असे नामोहरम केले.

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीला पराभवाचा धक्का बसला. डेन्मार्कच्या किम अ‍ॅस्टरूप आणि अँडर्स रॅसमुसीन जोडीने त्यांना २१-१६, ११-२१, २१-१७ असे पराभूत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:26 am

Web Title: all england badminton tournament lakshya challenge is over abn 97
Next Stories
1 आज निर्णायक झुंज!
2 सूर्यकुमारच्या जडणघडणीत ‘अशोक त्रिमूर्ती’
3 साथियान, सुतिर्था, मनिका ऑलिम्पिकसाठी पात्र