05 April 2020

News Flash

कोणत्याही गोष्टीला शेवट असतोच, आयपीएलमध्ये बोली न लागलेल्या ब्रँडन मॅक्यूलमची प्रतिक्रीया

माझ्या सहकाऱ्यांसाठी मी आनंदी आहे !

आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव नुकताच जयपूरमध्ये पार पडला. २०१९ साली होणाऱ्या स्पर्धेसाठी बहुतांश संघमालकांनी महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम राखलं होतं. अनेक नवोदीत खेळाडूंना यात कोट्यवधी रुपयांच्या बोलीही लागल्या. याचसोबत काही नावाजलेल्या खेळाडूंना मात्र आपल्या संघात घेण्यामध्ये कोणीही तत्परता दाखवली नाही. न्यूझीलंडचा माजी तडाखेबाज फलंदाज ब्रँडन मॅक्युलमलाही या हंगामात कोणत्याही संघमालकाने बोली लावली नाही. मात्र या गोष्टीचं मॅक्युलमला अजिबात वाईट वाटलेलं नाहीये.

“प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. माझ्यावर बोली लागली नसली तरीही माझ्या संघातील काही खेळाडूंना आयपीएलमध्ये यंदा संधी मिळतेय यासाठी मी आनंदी आहे. माझ्यावर बोली लागली नाही याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. संधी मिळालेल्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा आहेत, मात्र भविष्यात तुमच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल हे कोणी सांगितलंय?” Radio Sports ला दिलेल्या मुलाखतीत मॅक्युलम बोलत होता.

आयपीएलच्या पहिल्या पर्वात मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असताना सलामीच्या सामन्यातच धडाकेबाज शतकी खेळी केली होती. गेल्या ११ हंगामांमध्ये ब्रँडन मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स, कोची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सामने खेळले. २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही मॅक्युलमन विविधी टी-२० लीगमध्ये खेळतच होता. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात त्याच्यावर बोली न लागल्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 4:18 pm

Web Title: all good things must come to an end says brendon mccullum after ipl auction snub
Next Stories
1 IND vs AUS : ऋषभ पंत अतिशय प्रतिभावान खेळाडू – ग्लेन मॅक्सवेल
2 IND vs AUS : मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी विराट एक – डेनिस लिली
3 IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत हार्दिक पांड्याला संघात खेळवा !
Just Now!
X