News Flash

आयपीएलचे सामने रात्री आठ वाजताच सुरु होणार – विनोद राय

7 वाजता सामना सुरु करण्यास संघमालकांचा होता विरोध

आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांच्या वेळांबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आलेला आहे. 23 मार्चपासून सुरु होणारे आयपीएलचे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरु होणार असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिलं. संध्याकाळचे सामने 4 वाजता तर रात्रीचे सामने 8 वाजता सुरु होतील.

अवश्य वाचा – आयपीएलदरम्यान थकवा जाणवल्यास जरुर विश्रांती घेईन – भुवनेश्वर कुमार

मधल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय सामन्यांची वेळ 7 वाजता करणार असल्याची चर्चा होती. अकराव्या हंगामाच्या उत्तरार्धातही बीसीसीआयने काही सामन्यांची वेळ संध्याकाळी 7 वाजता ठेवली होती. मात्र काही संघमालकांचा या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी सामन्यांची वेळ रात्री 8 वाजताचीच ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 8:43 pm

Web Title: all ipl 2019 matches to have 8 pm start
टॅग : IPL 2019
Next Stories
1 WWE : मुंबईत रंगली TRYOUTS स्पर्धा; ८० भारतीयांची झाली निवड
2 धोनीसाठी वय हा मुद्दा गौण, विश्वचषकानंतरही संघात खेळू शकतो – सौरव गांगुली
3 Video : …म्हणून आफ्रिकेच्या फलंदाजाने ड्रेसिंग रूममध्ये रागाच्या भरात आपटली बॅट
Just Now!
X