News Flash

कसोटी क्रिकेटमधली 10 लाखावी धाव, अॅलन बॉर्डर आणि वानखेडे मैदान; जाणून घ्या नातं

आजच्या दिवशी काढली होती 10 लाखावी धाव

1986 साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला कसोटी सामना हा अनेक विक्रमांसाठी ओळखला जातो. या कसोटी सामन्यात सुनिल गावसकर यांनी आपलं 33 वं शतक झळकावलं. गावसकर माघारी परतल्यानंतर दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री या मुंबईच्या खेळाडूंनी शतकं झळकावली. याचसोबत आजच्या दिवशी 1986 साली कसोटी क्रिकेटमधली 10 लाखावी धाव काढली गेली होती. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या 3 फलंदाजांनी शतकं झळकावण्याची कसोटी क्रिकेटमधली ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी न्यूझीलंडच्या जॉन राईट, जेफ क्रो आणि इयान स्मिथ यांनी इंग्लंडविरुद्ध ऑकलंड कसोटीत अशी कामगिरी केली होती.

कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाचा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारताकडे 172 धावांची आघाडी होती. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यासाठी भारतीय संघाने आक्रमक क्षेत्ररक्षण रचना करत कांगारुंवर दडपण आणलं. मात्र अॅलन बॉर्डर आणि डीन जोन्स या खेळाडूंनी भारतीय आक्रमणाचा समर्थपणे सामना केला. सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकल्यानंतर प्रेक्षकांचा रस कमी झाला, मात्र याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डरने एक अनोखी विक्रमी कामगिरी केली.

अवश्य वाचा – ‘नो बॉल न टाकलेला माणूस’, ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

भारताकडून पदार्पण करणाऱ्या राजू कुलकर्णी यांच्या गोलंदाजीवर पाचव्या षटकादरम्यान डीन जोन्स यांनी एक धाव काढत अॅलन बॉर्डर यांना स्ट्राईक दिली. यानंतर बॉर्डर यांनी राजू कुलकर्णी यांच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला, बॉर्डर यांच्या चौकारातून निघालेली धावा ही कसोटी क्रिकेटमधली 10 लाखावी धावा ठरली. अपेक्षेप्रमाणे हा सामना अनिर्णित राहिला, राजू कुलकर्णी यांनी पहिल्याच सामन्यात 3 बळीही घेतले. या घटनेनंतर 10 लाखावी धाव डीन जोन्स यांनी काढली की अॅलन बॉर्डर यांनी याच्यावर अनेक मतमतांतर होती. मात्र काही कालावधीनंतर करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान बॉर्डर यांनीच 1द लाखावी धाव काढल्याचं समजतं आहे. या कारणासाठी आजचा दिवस क्रीडा प्रेमींच्या कायम लक्षात राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 6:13 pm

Web Title: allan border hits the one millionth run in test cricket
Next Stories
1 केवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू
2 ‘नो बॉल न टाकलेला माणूस’, ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम
3 कांगारुंवर मात करत पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीत बाजी; मालिकाही टाकली खिशात
Just Now!
X