04 August 2020

News Flash

अलोन्सोचा थरारक विजय

दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या फर्नाडो अलोन्सोने उत्कंठावर्धक रंगलेल्या स्पॅनिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावून घरच्या चाहत्यांना विजयाची भेट दिली. अलोन्सोपाठोपाठ फेलिपे मासाने तिसरा क्रमांक

| May 13, 2013 12:46 pm

दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या फर्नाडो अलोन्सोने उत्कंठावर्धक रंगलेल्या स्पॅनिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावून घरच्या चाहत्यांना विजयाची भेट दिली. अलोन्सोपाठोपाठ फेलिपे मासाने तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे या शर्यतीवर फेरारीचे वर्चस्व दिसून आले.
अलोन्सोचे या मोसमातील हे दुसरे तर कारकीर्दीतील ३२वे जेतेपद ठरले. टायरचा योग्य वापर, अचूक रणनीती, कारवर नियंत्रण राखत अलोन्सोने लोटसच्या किमी रायकोनेन याला मागे टाकत जेतेपदाला गवसणी घातली. ‘‘घरच्या चाहत्यांकडून माझ्यासह फेरारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असताना जेतेपद पटकावून त्यांना खूश केल्यामुळे मला कमालीचा आनंद झाला आहे,’’ असे अलोन्सोने सांगितले.
नवव्या क्रमांकावरून सुरुवात करत मासाने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्यामुळे रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेल आणि मार्क वेबर यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पोल पोझिशनपासून सुरुवात करणाऱ्या मर्सिडिझच्या निको रोसबर्गने सहावा क्रमांक प्राप्त केला. सहारा फोर्स इंडियाच्या पॉल डी रेस्टाने सातवे स्थान मिळवले. मॅकलॅरेनचे जेन्सन बटन आणि सर्जीओ पेरेझ आठवे आणि नववे आले. टोरो रोस्सोच्या डॅनियल रिकार्डिओने दहावे स्थान पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2013 12:46 pm

Web Title: alonso thrills spain with stylish win
Next Stories
1 आयपीएलमध्ये लवकरच दिसणार ‘दस का दम’!
2 चौथ्या फेरीत आनंदची गाठ नाकामुराशी
3 आशियाई चषकासाठी भारतीय महिला फुटबॉल संघ जाहीर
Just Now!
X