News Flash

देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करत राहीन, अर्जुन पुरस्कारानंतर रविंद्र जाडेजाची प्रतिक्रीया

रविंद्र जाडेजा सध्या वेस्ट इंडिजमध्ये

भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त २९ ऑगस्ट रोजी देशात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून विविध क्रीडा प्रकारांत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली होती.

रविंद्र जाडेजा सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या कारणासाठी गुरुवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्याला तो हजर राहू शकला नाही. मात्र जाडेजाने वेस्ट इंडिजवरुन एका व्हिडीओद्वारे अर्जुन पुरस्काराबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. याचसोबत देशासाठी कायम सर्वोत्तम कामगिरी करत राहिन असा आत्मविश्वासही जाडेजाने यावेळी व्यक्त केला.

अँटीग्वा येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, जाडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:41 pm

Web Title: always try to make india proud says ravindra jadeja after receiving arjuna award psd 91
टॅग : Ravindra Jadeja
Next Stories
1 “मेजर ध्यानचंदना भारतरत्न द्या म्हणून सरकारकडे भीक मागणार नाही”
2 ….म्हणून आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनीला भारतीय संघात स्थान नाही
3 ISSF Shooting World Cup : अभिषेक वर्माला सुवर्णपदक, सौरभ चौधरीला कांस्य
Just Now!
X