सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 34 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाने 288 धावांपर्यंत मजल मारली. रोहित आणि धोनीचा अपवाद एकाही फलंदाजाचं फॉर्मात नसणं भारताला चांगलचं भोवलं. या धक्क्यातून भारत सावरतो न सावरतो तोच अंबाती रायुडूने संघाच्या अडचणींमध्ये भर टाकली आहे. पहिल्या सामन्यात अंबातीने काही काळ गोलंदाजी केली होती.

अवश्य वाचा – हार्दिक-लोकेश राहुलच्या जागी शुभमन गिल-विजय शंकरची संघात निवड

मात्र त्याच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी सामनाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं असून यासंदर्भातला अहवालही भारतीय संघ व्यवस्थापनाला दिला आहे. रायुडूची गोलंदाजीची शैली ही आयसीसीच्या नियमांमध्ये बसत नसल्याचं सामनाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याचं कळतंय. यामुळे पुढील 14 दिवसांमध्ये रायुडूला आपल्या शैलीची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत रायुडू आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करु शकणार आहे. त्यामुळे रायुडूच्या चाचणीचा निकाल नेमका काय येतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : धोनी चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज – रोहित शर्मा